पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरुड पोलिसांकडे तक्रारअर्ज देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे महत्त्व किती?

महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच कोथरुड परिसरात पार पडली. या स्पर्धेत मारुती सातव यांनी पंच म्हणून काम पाहिले. सातव यांच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने संपर्क साधला. मल्ल सिकंदर शेख याच्याशी झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चार गुण बहाल केल्याचा आरोप अज्ञाताने केला तसेच सातव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोडवे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे. या प्रकरणात सातव यांचा जबाब नोंदवून घेण्यात येणार असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra kesari wrestling tournament referee maruti satav gets threat call on mobile phone pune print news rbk 25 zws