वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मेट्रोच्या कामाला नव्या वर्षांत आणखी गती मिळणार आहे. वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गिकांचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी नवे वर्ष महत्त्वाचे ठरणार असून पुढील बारा महिन्यांत भुयारी मार्ग आणि अन्य वाहतूक सुविधा एकमेकांशी जोडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या वर्षांत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला वेग मिळणार हे निश्चित झाले आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्पा अंतर्गत स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिका क्रमांक एक आणि वनाज ते रामवाडी या मार्गिका क्रमांक दोनची कामे महामेट्रोकडून सुरू करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन झाले आणि वर्षभरातच मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांच्या कामांना वेगात प्रारंभ झाला. त्यामुळे नव्या वर्षांतही मेट्रोचे काम अधिक गतीने पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले आहे. मेट्रो प्रकल्पासाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या व्हायडक्ट सेगमेंटची उभारणी हे सरत्या वर्षांचे वैशिष्टय़ ठरले. नागपूर मेट्रो प्रकल्पाला हा टप्पा गाठण्यासाठी २२ महिन्यांचा कालावधी लागला होता. मात्र पुणे मेट्रो प्रकल्पाअंतर्गत अवघ्या ११ महिन्यांतच या कामाला प्रारंभ झाला आहे.
वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गिकांचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दोन्ही मार्गिकांची कामे २०१९ पर्यंत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्या दृष्टीने २०१८ हे वर्ष कामाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. मार्गिकांची कामे पूर्ण झाल्यानंतर विद्युत विषयक, स्थापत्य आणि अन्य किरकोळ कामे हाती घेण्यात येतील. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी भुयारी मार्ग आणि अन्य वाहतूक सुविधा एकमेकांना जोडण्यासाठीची कामेही नव्या वर्षांत होणार असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
भुयारी मार्गाचा वापर प्रवाशांना सहज करता यावा, यासाठी या मार्गावर असणाऱ्या वाहतूक सुविधा एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट येथे वाहतुकीच्या विविध साधनांचा समन्वय साधला जाणार असून या जोडणीची योजना आखण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वास्तुरचनाकाराची मदत घेतली जाणार आहे.
शिवाजीनगर येथे धावणाऱ्या एसटीच्या गाडय़ा, रेल्वे मार्ग आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अॅथॉरिटी-पीएमआरडीए) मेट्रो मार्ग एकमेकांना जोडण्यासाठीही प्रयत्न होणार आहेत. शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात मेट्रोचा पूर्व-पश्चिम उन्नत मार्ग (इलेव्हेटेड कॉरीडॉर) आहे. त्यासाठी मेट्रो मार्ग आणि बसेसशी मेट्रोचा समन्वय साधण्यात येईल.
विशेष म्हणजे मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागा देण्याचा निर्णय शासकीय पातळीवर घेण्यात आला असून या जागांचा वापर करणे आणि उर्वरित जागा संपादित करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
ही आहेत वैशिष्टय़े
- वाहतूक सुविधा एकमेकांना जोडण्यासाठीचे नियोजन
- प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हबचा आराखडा करण्यावर भर
- वर्षांत व्हायडक्ट सेगमेंट उभारणीचा टप्पा पूर्ण होणार