मोशीत क्रिकेट स्टेडियम उभारण्याची आवश्यकता नाही. महापालिका प्रशासकीय नवीन इमारत ही नागरिकांची गरज नाही. त्याऐवजी प्रशासनाने शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिकेसमोर आंदोलन केले. शहराध्यक्ष सचिन चिखले, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरासे, रुपेश पटेकर, विशाल मानकरी आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> सावधान! फॉलकोडिनयुक्त औषधे धोकादायक; नशेसाठीही  होतोय वापर

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

आंदोलनानंतर शहराध्यक्ष  चिखले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना दररोज पाणीपुरवठा करण्याबाबत निवेदन दिले. शहरामधील अण्णासाहेब मगर स्टेडियम अनेक दिवसापासून धूळ खात पडलेले आहे.  काम रखडलेल्या अवस्थेत आहे.  क्रीडांगणांची  दुरावस्था झालेली आहे. याकडे महापालिकेचे कोणतेही लक्ष नाही. क्रीडांगणाचे खासगीकरण करण्याचा प्रशासन घाट घालत होते. नव्याने एवढा मोठा खर्च करून मोशीत क्रिकेट स्टेडियम कशाला? अगोदर शहरातील सर्व क्रीडांगणे व्यवस्थित व चांगल्या दर्जाची करून शहरातील सर्व क्रीडापटूंना वापरण्याजोगी करून देण्यात यावी.

हेही वाचा >>> पुणे : रेल्वे प्रवास आणखी सोपा…स्थानकांऐवजी आता लोकप्रिय ठिकाणांच्या नावाचा वापर

अण्णासाहेब मगर स्टेडियमची दुरुस्ती करावी. नव्याने महापालिकेची इमारत बांधण्यासाठी मोठा निधी वापरण्यात येणार आहे. सध्या  नागरिकांची व शहरवासीयांची ही गरज नाही. मागील तीन वर्षांपासून शहरातील  नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा प्रशासन करत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना, महिला वर्गांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी जास्त तर तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी शहराध्यक्ष चिखले यांनी केली.