स्पर्धेतील संशोधनाचे आता उद्योगात रुपांतर 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना स्पर्धेत उतरण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे प्लास्टिक बंदीनंतर उद्योगामध्ये रुपांतर करण्याची संधी पुण्यातील आदित्य दातार आणि अपूर्वा रावेतकर या तरुण संशोधकांना मिळाली आहे. प्लास्टिकच्या चमच्यांना पर्याय म्हणून संपूर्ण पर्यावरण पूरक अशा बायोप्लास्टिक चमच्यांची निर्मिती त्यांनी केली आहे.

आदित्य आणि अपूर्वा यांनी पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. आयआयटी मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीन हॅकेथॉन स्पर्धेत प्लास्टिक कपाला पर्यावरण पूरक पर्याय देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आले. आदित्य दातार म्हणाले, त्या स्पर्धेत उसाची चिपाडे, सुपारीच्या काथ्या वापरुन केलेल्या कपावर संशोधन केले, मात्र हे पर्याय मर्यादित स्वरुपाचे असल्याने याच क्षेत्रात आणखी संशोधन करायचे आम्ही ठरवले. त्यातून प्लास्टिकसारखे गुणधर्म असलेल्या बायोप्लास्टिक या घटकाची माहिती मिळाली. बायोप्लास्टिक हे लहान गोळ्यांच्या स्वरुपात उपलब्ध असते आणि मातीत टाकल्यावर काही काळात त्याचे खतामध्ये रुपांतर होते. चमच्याचा साचा बनवून त्याच्या मदतीने बायोप्लास्टिक चमचे तयार करण्याचा प्रयोग आम्ही केला. चेन्नईतील संस्थेमध्ये त्याचे नमुने पाठवून हे चमचे पर्यावरण पूरक असल्याच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत.

अपूर्वा रावेतकर म्हणाल्या,की प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर अनेक जण योग्य पर्याय शोधत आहेत. समाज माध्यमांमध्ये याबाबतची माहिती वेगाने पसरत असून मोठय़ा संख्येने नागरिक या चमच्यांची मागणी करत आहेत, जुलै महिन्यापासून त्यांना ते पुरवणे शक्य आहे.