पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी-१ मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या एकूण ४९ पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील भूषण निवृत्ती लांडगे यांनी अराखीव आणि मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर महिला अराखीव गटातून सांगली जिल्ह्यातील गीतांजली रवींद्रनाथ कोळेकर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

हेही वाचा : तेल कंपन्यांची हजारो डॉलरची बचत करणार ‘सिली’ उपकरण… काय आहे संशोधन?

government lanched ladki bahin yojana but woman not appointed in commitee set up to implement scheme
नागपूर : लाडक्या बहिणींच्या समितीवर सर्वच भाऊ
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Audit Provisions in the Income Tax Act
प्राप्तिकर कायद्यातील लेखापरीक्षणाच्या तरतुदी- प्रवीण देशपांडे
case against three transport inspectors for corruption
मुंबई : भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तीन परिवहन निरीक्षकांविरोधात गुन्हा
Return of demand letter for 258 Agriculture seats from MPSC
कृषीच्या २५८ जागांच्या मागणीपत्राची एमपीएससीकडून परतपाठवणी
central and state government introduce Unified Pension Scheme to its employee
विश्लेषण : जुन्या पेन्शनवर एकीकृत निवृत्तिवेतन योजनेचा पर्याय किती फायद्याचा?
Mumbai, Badlapur Case,Suspended police Officer, Shubhada Shitole Shinde Transferred , assembly elections, police transfers, senior police inspectors
बदलापूर प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे- शिंदे यांच्यासह ठाण्यातील १४ पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
rape, Vasai, School Rape Vasai, Yadvesh vikas shala rape,
Vasai Crime News : यादवेश विकास शाळेतील बलात्कार प्रकरण, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल आणि प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कटऑफ गुण) एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके ऑनलाइन खात्यात पाठवल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले.