पुणे : किनारपट्टीसह घाटमाथ्यावर पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीवर पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून किनारपट्टीवर वेगाने बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे वारे पश्चिम घाट ओलांडून पुढे येत आहेत. त्यामुळे घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय उत्तर प्रदेश आणि ईशान्य मध्य प्रदेशावर आहे. त्यामुळे विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यात सर्वदूर सरीवर सरी
राज्यात शनिवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. डहाणूत सर्वाधिक १११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी आणि सांताक्रुजमध्ये ४७ मिमी, कुलाब्यात १७ मिमी आणि हर्णेत २१ मिमी पाऊस पडला आहे. पश्चिम घाटात महाबळेश्वरमध्ये ६२ मिमी, जळगावात २२ मिमी, नाशिकमध्ये २३ मिमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये २२ मिमी, धाराशिव आणि उदगीरमध्ये ११ मिमी, यवतमाळमध्ये ४८ मिमी, चंद्रपुरात १७ मिमी, बुलडाण्यात १२ आणि अमरावतीत १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा : पुणे: पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पकडले, खंडणी विरोधी पथकाची कारवाई
रविवारसाठी पावसाचा इशारा
लाल इशारा – रायगड, पुणे, सातारा.
नारंगी इशारा – रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव.
पिवळा इशारा – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भ.