पुणे : राज्यात करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४५१ झाली असून, त्यातील तब्बल १८९ रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात करोनामुळे मागील २४ तासांत एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे: रुग्णवाहिकेतून गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही रुग्ण सापडले होते. राज्यातील जेएन.१ ची एकूण रुग्णसंख्या मंगळवारी २५० होती. त्यात बुधवारी एकाच दिवसांत २०१ रुग्णांची भर पडली आहे. पुण्यात बुधवारी जेएन.१ च्या ३९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १८९ झाली असून, राज्यातील जेएन.१च्या एकूण रुग्णांपैकी ४० टक्के पुण्यात आहेत. त्याखालोखाल ठाणे ८९, मुंबई ३७, छत्रपती संभाजीनगर ३१, नागपूर ३०, रायगड १३, सोलापूर ९, अमरावती ९, सांगली ७, कोल्हापूर ७, रत्नागिरी ५ , जळगाव ४, हिंगोली ४, अहमदनगर ३, बीड ३, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, अकोला १, सातारा १, सिंधुदुर्ग १, यवतमाळ १ आणि नंदुरबार १ अशी रुग्णसंख्या आहे.

हेही वाचा >>> …आणि नौदलप्रमुखांनी मारल्या पुशअप्स! व्हिडिओ होतोय व्हायरल

राज्यात मागील २४ तासांत करोनाच्या ८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याच वेळी ९७ रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के असून, मृत्युदर १.८१ टक्के आहे. राज्यात मागील २४ तासांत १२ हजार २६९ चाचण्या झाल्या. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर ०.६६ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य सहसंचालक डॉ. बी. आर. पवार यांनी दिली.

सक्रिय रुग्णसंख्या ५७९ वर

राज्यातील करोनाची सक्रिय रुग्णसंख्या ५७९ आहे. त्यातील ५३५ म्हणजेच ९२.४ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ४४ असून, त्यांचे प्रमाण ७.६ टक्के आहे. एकूण रुग्णांमध्ये अतिदक्षता विभागातील रुग्णांचे प्रमाण ३.३ टक्के आहे. राज्यात १ जानेवारी २०२३ पासून करोनामुळे १४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ७०.९५ टक्के ६० वर्षांवरील आहेत. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी ८४ जणांना सहव्याधी होत्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra reports 451 cases of covid new jn1 variant infected patient in maharashtra pune print news stj 05 zws