महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे चैतन्यमहाराज देगलूरकर यांना प्रा. न. र. फाटक स्मृती संतसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अंजली कुलकर्णी यांना कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार आणि प्रकाश घोडके यांना कविवर्य ना. घ. देशपांडे पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांना रामाचार्य अवधानी पुरस्कार, डॉ. अनिल लचके यांना गो. रा. परांजपे पुरस्कार, डॉ. वेदकुमार वेदालंकार यांना श्रीपाद जोशी पुरस्कार आणि राजकुमार तांगडे यांना कमलाकर सारंग पुरस्कार जाहीर झाला आहे. परिषदेतर्फे विशेष ग्रंथकार आणि वार्षिक पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. परिषदेच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला २६ मे रोजी एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि कार्यवाह उद्धव कानडे यांनी गुरुवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरस्कार आणि विजेते
ह. ना. आपटे पारितोषिक – शोध – मुरलीधर खैरनार (मरणोत्तर), आनंदीबाई शिर्के पारितोषिक – ढोरवाटा – विलास केळसकर, म. वि. गोखले पारितोषिक – शेक्सपिअर – डॉ. लता मोहरीर, रा. ना. नातू पारितोषिक – साद नर्मदेची – सुधाकर लोंढे, सत्यशोधक केशवराव विचारे पारितोषिक – सहजीवनातील प्रकाशवाटा – डॉ. नीला पांढरे, गणेश सरस्वती ठाकूरदेसाई पारितोषिक – भूदान चळवळ – डॉ. गणेश राऊत, शि. म. परांजपे पारितोषिक – नवे जग नवी तगमग – कुमार शिराळकर, अभिजात पारितोषिक – बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे – डॉ. प्रल्हाद लुलेकर, शंकर पाटील पारितोषिक – जोहार – सुशील धसकटे, दि. बा. मोकाशी पारितोषिक – ऑफबीट भटकंती-२ – जयप्रकाश प्रधान, ग. ह. पाटील पारितोषिक – आमच्या शिक्षणाचे काय? – हेरंब कुलकर्णी, नी. स. गोखले पारितोषिक – करीअरचा पासवर्ड – गजेंद्र बडे, लक्ष्मीबाई टिळक पारितोषिक – हाणला कोयता झालो मास्तर – डॉ. सुभाष शेकडे, मृत्युंजय पारितोषिक – मी अश्वत्थामा चिरंजीव – अशोक समेळ, कमल व के. पी. भागवत पारितोषिक – गुडमॉर्निग नमस्ते – डॉ. श्याम अष्टेकर, विजया गाडगीळ पारितोषिक – ग्रेस : वेदना आणि सौंदर्य – डॉ. अजय देशपांडे, डॉ. अरिवद वामन कुलकर्णी पारितोषिक (विभागून) – रंगनाथ पठारे यांच्या साहित्यातील स्त्री-दर्शन – डॉ. राजेंद्र सलालकर आणि महाराष्ट्रातील विस्थापित आणि मराठी कादंबरी – डॉ. संजय नगरकर, वि. वा. बोकील पारितोषिक (विभागून) – वजनदार – डॉ. सुमन नवलकर आणि नवलगिरी – रमेश तांबे, अंबादास माडगूळकर पारितोषिक – गंगे तुझ्या तीराला -चंद्रकला कुलकर्णी, शरश्चंद्र मनोहर भालेराव पारितोषिक – सत्यशोधकांचा साहित्यविषयक दृष्टिकोन : एक अभ्यास – डॉ. सुधाकर जाधव, डॉ. पुष्पलता शिरोळ पारितोषिक – अचूक निदान – डॉ. रवी बापट, मालिनी शिरोळे पारितोषिक – गुल्लेर – बाबू गंजेवार, अ‍ॅड. त्रिंबकराव शिरोळे पारितोषिक (विभागून) – अनवाणी पाय – प्रा. आप्पासाहेब खोत आणि एक झोका – डॉ. मंदा खांडगे, श्रीवत्स पुरस्कार – स्त्री साहित्याचा मागोवा-खंड ४, आशा संत पुरस्कार – केल्याने भाषांतर – अनघा भट, सुभाष हरी गोखले पारितोषिक – मार्केट मेकर्स – चंद्रशेखर टिळक.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra sahitya parishad announces annual award