पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे भानू काळे, संजीवनी बोकील, दीपा गोवारीकर, अभिराम भडकमकर, मिलिंद ढेरे, शफाअत खान यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
परिषदेच्या ११६ व्या वर्धापनदिनानिमित्त २६ मे रोजी एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर, डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
या कार्यक्रमात जयवंत महाराज बोधले, डॉ. लीला गोविलकर, प्रा. विश्वास वसेकर, संजीवनी बोकील, परेश प्रभू, दीपा गोवारीकर, दिग्विजय वैद्य आणि माधवी नानल, डॉ. आनंद जोशी, माधवी घारपुरे, श्रीराम पचिंद्रे, संगीता पुराणिक आणि लीला शिंदे, शेखर देशमुख, डॉ. सरिता सोमाणी-दरक यांना विशेष ग्रंथकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर
भानू काळे, प्रवीण टोकेकर, अभिराम भडकमकर, डॉ. अंजली सोमण, मिलिंद ढेरे, प्रा. व. बा. बोधे, नंदू मुलमुले, मनोहर सोनवणे, डॉ. अशोक इंगळे, संपत मोरे, प्रा. संजय ठिगळे, रवी आमले आणि अनुपमा उजगरे, डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, जबीन शेख, डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. भारती सुदामे, अशोक कौतिक कोळी, अशोक लिंबेकर, डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर, मेधा कुलकर्णी, डॉ. नारायण शिंगटे, अक्षय शिंपी, एकनाथ आव्हाड, डॉ. कल्याणी झा, प्रसाद ढापरे, श्रीकांत जाधव, सुभाषचंद्र जाधव, अनिल महादार, डॉ. विजया देशपांडे, शफाअत खान, इनामदार सृजन उन्मेष, डॉ. हेमा पुरंदरे आणि डॉ. सतीशकुमार पाटील यांना वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.