राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल येत्या ८ जून रोजी जाहीर होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी शनिवारी ही माहिती दिली. निकालाच्या दिवशी दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना इंटरनेटवर हा निकाल पाहता येईल. गेल्या काही दिवसांपासून दहावीचा निकाल कधी लागणार, याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना लागली होती. निकालाच्या तारखांविषयी सातत्याने वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत होते. व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल साईटसवर फिरत असलेल्या संदेशांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
आणखी वाचा