पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावी आणि दहावीची परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विद्यार्थ्यांचे मोफत समुपदेशन केले जाणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या दरम्यान होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in