पुणे : महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष एम. ए. सय्यद आणि सचिव दिनकर पाटील यांनी येरवडा कारागृहाला भेट देऊन तेथील सोयी सुविधांची पाहणी केली. सय्यद आणि पाटील यांनी कारागृहातील गांधी बराकला भेट दिली. त्यानंतर त्यांनी कारखाना विभाग, दवाखाना विभाग, अतिसुरक्षा विभाग या विभागांची पाहणी केली, तसेच कैद्यांशी संवाद साधून कारागृहात मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत चौकशी केली.

हेही वाचा : समता सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी १७ वर्षानंतर अटकेत, सीआयडीची दिल्लीत कारवाई

कारागृहातील दूरध्वनी विभाग, दूरदृश्य प्रणाली सुविधा, कैद्यांच्या नातेवाईकांशी होणाऱ्या मुलाखतीची व्यवस्था आणि कक्ष, कैद्यांच्या आरोग्याबाबत घेतली जाणारी काळजी याबाबतची माहिती घेतली. कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पी. पी. कदम, उपअधीक्षक आर. आय. गायकवाड यावेळी उपस्थित होते.