मांढरदेव यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातून ४ ते ७ जानेवारी या कालावधीत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
एसटीच्या पुणे विभागातील शिवाजीनगर (वाकडेवाडी), स्वारगेट, पिंपरी-चिंचवड, भोर, नारायणगाव, राजगुरूनगर, तळेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड या बस स्थानकांतून मांढरदेव यात्रेसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनंतर पौष अमावस्येपर्यंत येणाऱ्या प्रत्येक मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी मांढरदेवसाठी स्वारगेट आणि भोर स्थानकातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा- पुणे विमानतळावरील सर्वेक्षणात आणखी दोन प्रवाशांना करोना संसर्ग; रुग्णांची संख्या सहावर
त्याचप्रमाणे पौष पौर्णिमेनिमित्त नारायणपूर, थापलिंग, वरवे, कोथरन येथेही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.