पुणे : विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमादरम्यान मिळवलेले श्रेयांक (क्रेडिट) साठवण्यासाठी ‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ची निर्मिती करण्यात आली आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा विदा ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या संकेतस्थळावर नोंदवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.

यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी याबाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, लवचीक, बहुशाखीय श्रेयांक आधारित शिक्षण देण्याची तरतूद आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे श्रेयांक साठवण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्याचा सुलभतेने वापर, हस्तांतर करता येण्यासाठी ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट उपयुक्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट’ शक्य होणार आहे. या अनुषंगाने उच्च शिक्षण संस्थांना २०२१, २०२२, २०२३ या वर्षांतील श्रेयांक विदा भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. तसेच २०२४मधील विदा भरण्यासाठी जून २०२५ ही मुदत आहे. त्यानंतर हा विदा गोठवला जाणार आहे. त्यात कोणताही बदल करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Citizens in rural areas will get property certificate thane news
ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “

हेही वाचा : व्यावसायिक अभ्यासक्रमांत मुलींच्या प्रवेशसंख्येत वाढ… मोफत शिक्षण योजनेचा परिणाम?

उच्च शिक्षण संस्थांना चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीमनुसार असलेल्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची श्रेयांकपत्रके, तसेच चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये नसलेल्या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची गुणपत्रके, प्रमाणपत्रे प्रणालीमध्ये भरायची आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांनी दिलेल्या मुदतीचे पालन करून विद्यार्थ्यांचा श्रेयांक विदा प्रणालीमध्ये प्राधान्याने भरावा. विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींची येरवडा कारागृहात एकत्रित चौकशी, न्यायालयाकडून पोलिसांना परवानगी

ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, आतापर्यंत ५६० स्वायत्त महाविद्यालये, १३१ राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था, ३६ कौशल्य संस्था, २७१ एकल संस्था, १ हजार ५० विद्यापीठे, १५७ अन्य संस्थांनी माहिती भरल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक २७८ संस्था महाराष्ट्रातील आहेत. त्या खालोखाल तमिळनाडूतील २१५, आंध्र प्रदेशातील २०८ संस्थांचा समावेश आहे.

Story img Loader