पिंपरी-चिंचवड: वोट जिहादवरून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवार यांनी भाजप संबंधी केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कडाडून टीका केली आहे. आमच्यावर आरोप करणाऱ्या शरद पवारांना हिंदू म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी सांगावं ते हिंदू नाहीत. असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केला. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा : काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ
किरीट सोमय्या यांनी वोट जिहाद आणि लव्ह जिहाद वरून महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. वोट जिहादसाठी बाहेरून अडीचशे कोटी मालेगाव येथील सिराज मोहम्मदच्या बँक खात्यात आले आहेत. यामुळं महाविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे. काँग्रेस नेहमी म्हणायची की आम्ही वोट जिहाद करत नाहीत. पुढे ते म्हणाले, जी मुस्लिम व्यक्ती महाविकास आघाडीला वोट करणार नाही तिला बायकॉट करण्यात येणार आहे. त्यांचे अन्न- पाणी बंद करण्यात येईल. त्या मुस्लिम व्यक्तीला जालीम घोषित करून घनश्याम दास असं नाव ठेवण्यात येणार आहे. असा फतवा मौलाना नौमानी यांनी काढला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार केली असून याबाबत परभणीचे जिल्हाधिकारी ही चौकशी करत आहेत. पुण्यातही लव्ह जिहादच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ऐन निवडणुकीत आणि आचारसंहिताच्या काळात पैसे देण्यात आले आहेत. पण यावेळी वोट जिहाद चा फटका महाविकास आघाडी बसणार आहे. हिंदू समाजातील नागरिक जागे झाले आहेत. त्यांनी निर्धार केला आहे. लव्ह जिहाद, वोट जिहादच्या विरोधात ते मतदान करायचं. पुढे ते म्हणाले, शरद पवार हे पुण्यातील एका विशिष्ट समाजाबद्दल बोलत आहेत. एरव्ही “मुस्लिम खतरे में है, इस्लाम खतरे में है” असं खुले आम सांगतात, असं ही किरीट सोमय्या म्हणाले.