पिंपरी : पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येणार्या पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर सुमारे एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांकडून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. मावळची तळेगाव दाभाडे येथील नूतन महाविद्यालयात आणि चिंचवडची थेरगाव शंकर गावडे स्मृती कामगार भवन येथे मतमोजणी होणार आहे. मतदान झाल्यानंतर मतपेट्या स्ट्राँगरूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अतिसंरक्षित कक्ष (स्ट्रॉंग रूम) पाहणी केली.
हेही वाचा : निवडणूक संपताच खिशाला झळ! पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये सीएनजी दरवाढीचा दणका; बदललेले दर जाणून घ्या…
सुरक्षेच्या दृष्टीने अधिकार्यांना सूचना केल्या. मतमोजणीसाठी एक पोलीस सह आयुक्त, एक अपर पोलीस आयुक्त, चार पोलीस उपायुक्त, पाच सहायक पोलीस आयुक्त, २९ पोलीस निरीक्षक, ६४ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ६५६ पोलीस अंमलदार, राज्य राखीव दलाची एक कंपनी, केंद्र सुरक्षा दलाच्या चार कंपन्या, हरियाणा पोलीस असा फौजफाटा तैनात असणार आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी जागा निश्चित
चिंचवड मधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना थेरगाव गावठाण येथे तर महायुतीच्या कार्यकर्त्यांना तापकीर चौक ते तापकीर मळा या दरम्यान रस्त्याच्या कडेची मोकळ्या जागा थांबण्यासाठी राखीव राहील. भोसरी आणि पिंपरी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना म्हाळुंगे पोलीस चौकी ते बालेवाडी स्टेडियम मुख्यप्रवेशद्वाराच्या रोडवर थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राजवाडा गेट ते मुळा नदी पुलापर्यंत सेवा रस्त्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
हेही वाचा : पिंपरी : मतमोजणीनिमित्त उद्या ‘या’ भागातील वाहतुकीत बदल
मावळमधील अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांना थांबण्याकरीता नूतन महाविद्यालयाच्या उजव्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे. तर, महायुतीच्या कार्यकर्त्यांना वडगाव फाटा ते स्वराज नगरी मार्गे येवून माउंट सेंट अॅन स्कुलच्या वाहनतळामध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.