पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी शहर-जिल्ह्यासह २१ मतदारसंघात झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (२३ नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मतदारांचा कौल मिळणार याचे चित्र शनिवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून एकूण २१ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये एकूण ३०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात ६१.६२ टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी करून दुपारपर्यंत निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मोतमोजणीच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शहरासह जिल्ह्यात मतदारांची वाढ झाल्याने मतदान केंद्रे वाढवण्यात आली. आठ हजार ४६२ मतदान केंद्रांवर झालेले मतदान आणि टपाली मतदानात झालेली वाढ विचारात घेऊन मतमोजणीसाठी ४६५ फेऱ्या होणार आहेत.

Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?
The Election Commission's rate card for Delhi Assembly elections sets spending limits on various items, from pens to elephants.
छोले भटूरे ३५ रुपये तर रॅलीतील हत्तीसाठी ६१५० रुपये, दिल्ली विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना किती खर्च करता येणार?
margin of victory in elections depends on voter participation IISER Pune developed model
निवडणुकीतील विजयाचे अंतर मतदारांच्या सहभागावर अवलंबून; ‘आयसर पुणे’ने विकसित केले मॉडेल

हेही वाचा : एमपीएससीतर्फे १ डिसेंबरला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नवे प्रवेश प्रमाणपत्र आवश्यक… काय आहेत मार्गदर्शक सूचना?

मतमोजणीसाठी सुमारे दोन हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीमध्ये ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांमधून सर्वाधिक ३० फेऱ्या पुरंदर मतदारसंघासाठी, तर शहरी मतदारसंघांत सर्वाधिक २५ फेऱ्या खडकवासला मतदारसंघात होणार आहेत. सर्वांत कमी १९ फेऱ्या आंबेगाव मतदारसंघासाठी होणार आहेत. उर्वरित मतदासंघांमध्ये २० ते २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असल्याने दुपारी तीन वाजेर्पयंत सर्व फेऱ्या पूर्ण होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केला.

शहरातील वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या आठ मतदारसंघासाठी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाचे गोदाम येथे, पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघासाठी बालेवाडी क्रीडा संकूल, तर चिंचवड मतदारसंघासाठी महानगरपालिका कर्मचारी संचलित कामगार स्मृती भवन येथे मतमोजणी होणार आहे. ग्रामीण मतदारसंघातून शिरूर मतदारसंघासाठी रांजणगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे, तर उर्वरीत नऊ मतदारसंघातील तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा : ‘पर्वती’त कौल कुणाला? मिसाळ यांची विजयाची मालिका सुरु राहणार की…

सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. प्रथम इलेक्ट्राॅनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट (ईटीपीबीएस) आणि टपाली मतपत्रिकांची मोजणी करून त्यानंतर मतदान यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे. मतदान यंत्रांसाठी ३९१ टेबल, टपाली मतदानासाठी ७९ टेबल आणि इटीपीबीएस मतपत्रिकांसाठी २८ टेबल असे नियोजन करण्यात आले आहे. मतदान यंत्रातील एका फेरीच्या मतमोजणीसाठी साधारणत: २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागेल. त्या दृष्टीने दोन हजार ३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे डाॅ. दिवसे यांनी स्पष्ट केले.

राजकीय पक्षांच्या अधिकृत प्रतिनिधींनाच प्रवेश

मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांकडून नियुक्त प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात आले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी संबंधित प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे. अन्य ठिकाणी प्रतिनिधी गेल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच एखाद्या उमेदवाराने पर्यायी (डमी) प्रतिनिधी नेमल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे डॉ. दिवसे यांनी सांगितले.

हेही वाचा :शुश्रूषेसाठी ठेवलेल्या एकाकडून पाच लाखांची खंडणी, पोलिसांकडून गुन्हा दाखल

मतमोजणी केंद्रात मोबाइल आणण्यास बंदी

निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारीची घोषणा ध्वनिक्षेपकाद्वारे केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रात उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाइल बाळगण्यास बंदी आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

मनुष्यबळ व्यवस्था

  • सुक्ष्म निरीक्षक ५२८
  • मतमोजणी पर्यवेक्षक ५३३
  • मतमोजणी सहाय्यक ५७७

Story img Loader