शंकर जगतापांपुढे बंडखोरीचे आव्हान

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासह जगताप कुटुंबातील तसेच पक्षातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी पिंपळे गुरव गावातील पक्ष कार्यालयापासून रॅली काढत चिंचवड मध्ये निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यात आला. चिंचवड विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे यांचा अर्ज दाखल; लांडगे विरुद्ध गव्हाणे असा सामना होणार

माझ्यासमोर तुल्यबळ असा उमेदवार नाही. शरद पवार यांच्या पक्षातील कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असता तर ही लढत नक्कीच तुल्यबळ झाली असती. अशा शेलक्या शब्दात शंकर जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर टीका केली होती. महायुती मधून अजित पवार गटाचे नाना काटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यावर देखील शंकर जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना काटे यांच्यासोबत आम्ही उमेदवारी मागे घेण्यावरून बोलत आहोत. पक्षश्रेष्ठी देखील याबाबत तोडगा काढेल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला आहे. नेहमी आम्ही दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्यासाठी काम करतो. परंतु, वहिनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यानंतर माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिली. ती मी योग्य रीतीने पार पाडेल असा विश्वास देखील शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 shankar jagtap filed nomination from chinchwad assembly constituency pune print news kjp 91 zws