पुणे : राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार आहेत. कोणतीही सार्वत्रिक सुटी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शालेत उपलब्ध नसल्यास संबंधित शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना आहे, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.

शिक्षण आयुक्तालयाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना देण्याबाबत असे नमूद करण्यात आले. मात्र, या संदर्भात संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
29 villages, Vasai, Vasai latest news, Vasai marathi news,
वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
Markadwadi EVM Issue.
Markadwadi : “राम सातपुते फडणवीसांचं डबडं, ते वाजतच राहणार”, मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची टीका
Manoj Jarange Patil
Manoj Jarange : जरांगे विरूद्ध फडणवीस संघर्ष पुन्हा पेटणार? शपथविधी होताच पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम, म्हणाले…

हेही वाचा : Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

मांढरे दिलेल्या माहितीनुसार १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. शासनाने या संदर्भात परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. १८ आणि १९ रोजी सर्व शाळा सुरू राहतील. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळाबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना आहेत. त्यामुळे अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील.

Story img Loader