पुणे : भारतीय जनता पक्षाचा सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधनसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात मतदानाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन तासात ६.५० टक्के मतदान झाले. भाजपच्या हक्काच्या मतदारांबरोबरच विद्यमान मंत्र्यांनी बुधवारी सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजाविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

झपाट्याने विकसित झालेले उपनगर म्हणून कोथरूड उपनगराकडे पाहिले जाते. कसबा मतदारसंघानंतर कोथरूड मतदारसंघ भाजपचा हक्काचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना ( ठाकरे) पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे माजी गटनेते किशोक शिंदे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे विद्यमान मंत्री, उमेदवार चंद्रकांत पाटील या मतदारसंघातील आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मजबूत जाळे, भाजपचे संघटन येथे मोठ्या प्रमाणावर असल्याने कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील या हक्काच्या मतदारसंघात कितीचे मताधिक्य घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

हे ही वाचा… पैसे वाटपाच्या आरोपानंतर पर्वतीत पहिल्या दोन तासांत काय घडलं ? जाणून घ्या अपडेट्स…

मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मतदारसंघातील भाजपच्या मतदारांनी पहिल्या दोन तासातच मोठा प्रतिसाद दिला. अनेक मतदार केंद्रांवर मतदानासाठी मतदार रांगेत उभे असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे वगळल्याच्या, दर निवडणुकीत एकाच केंद्रावर मतदान होत असतानाही केंद्र बदलल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत हा प्रकार फारसा दिसला नाही. पहिल्या टप्प्यात सुशिक्षित मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच नवमतदारांमध्येही मतदानासाठी उत्साह दिसून आला. सकाळी अकरानंतरही मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडले. मतदानकेंद्र बदलल्याच्या, दुबार मतदारांबरोबर मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी यावेळी अपवादानेच दिसून आल्या.

कोथरूड मतदारसंघात काही झोपडपट्टी भागाचाही समावेश आहे. येथील हा मतदारांकडून दुपारच्या सत्रात मतदान होण्याची शक्यता आहे.

कोथरूडमध्ये महत्त्वाचे आणि अपक्ष असे एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथील मतदारांची संख्या ४ लाख ४० हजार ५५७ एवढी असून त्यामध्ये २ लाख २८ हजार ७९५ पुरूष मतदार आहेत. तर, महिला मतदारांची संख्या २ लाख ११ हजार ७४० अशी आहे. या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ४८.२० टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार का, याची उत्सुकता आहे.