आळंदी : महाराष्ट्र हा नेहमीच वारकरी विचाराने पुढे गेलेला आहे. तो भविष्यातही पुढे जाईल. या विचारांची आठवण सतत राहावी म्हणून आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच दर्शन घेण्यासाठी आळंदीत आल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं आळंदीत टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हातात टाळ घेऊन माऊलींचा गजर केला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंकजा मुंडे, राम शिंदे, आमदार अमित, गोरखे आणि आमदार शंकर जगताप आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,पांडुरंगाच्या आशीर्वादाने आम्हाला मोठा विजय मिळाला आहे. त्यानंतर आळंदीत येऊन माऊलींच दर्शन घेण्यासाठी आलो आहे. हा क्षण अत्यंत सुखाचा असतो. तो क्षण मला अनुभवायला मिळाला आहे.

आणखी वाचा-सीबीएसई बारावीची परीक्षा, दोन सीईटी परीक्षा एकाच वेळी… कोणत्या वेळापत्रकात बदल होणार?

पुढे ते म्हणाले, वारकरी विचाराने महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. भविष्यात ही पुढे जात राहील. या विचारांची आठवण सतत होत राहावी म्हणून इथे आलो आहे. पुढे ते म्हणाले, इंद्रायणी स्वच्छतेचे काम सुरू आहे. हे एक दिवसाच काम नाही. गावांच, शहरांच आणि उद्योगांचं पाणी हे नदीत सोडलं जात. ते शुद्ध करून इंद्रायणीत सोडायच आहे. ते काम सुरू केलं आहे. संबंधित गावांना, ग्रामपंचायत, महानगर पालिकांना निधी उपलब्ध करून देत आहोत. ते युद्ध पातळीवर सुरू करू अस आश्वासन ही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Story img Loader