महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती शहरात गुरुवारी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संघटनांच्या वतीने समताभूमी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
महात्मा फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त दत्तवाडी येथील आनंद मंडळ, बहुजन विकास महासंघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भारिप बहुजन महासंघ, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि मातंग समाज या संघटनांतर्फे गंज पेठेतील समताभूमी येथील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मातंग समाजाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुलेंची ‘सत्याची कविता’ सादर केली. पुणे विद्यापीठातही प्रशासकीय इमारतीसमोरील म. फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा