चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सध्या शहरात पाहायला मिळत आहे. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी आजचा दिवस सुपर संडे ठरला आहे. भाजपाचे नाना काटे, बंडखोर राहुल कलाटे यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला, तर अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या मध्यवरती प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. भाजपाचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज शहरात होते.
हेही वाचा- कसबा विधानसभा पोटनिवडणूक : अजित पवार यांच्या भाषणावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. अगोदर ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना आता तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. भाजपाकडून अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीकडून नाना उर्फ विठ्ठल काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राहुल कलाटे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. तसेच, महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आला. तर, भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या मध्यवरती प्रचार कार्यालयाच्या उदघाटन भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून बंडखोर राहुल कलाटे यांच्यासह भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच उमेदवार धावपळ करत आहेत. त्यामुळे आजचा रविवार हा उमेदवारांसाठी सुपर संडे ठरला हे मात्र खरं आहे.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आज प्रचाराची रणधुमाळी पहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या अन बंडखोर राहुल कलाटे यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटला. तर भाजपच्या अश्विनी जगतापांच्या प्रचार कार्यालयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी शुभारंभ केला. आज रविवार असल्यानं या तिन्ही प्रमुख उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. भाजपने सहानुभूतीसह विकासाचा मुद्दा लाऊन धरणार असल्याचं स्पष्ट केलं. तर महाविकासआघाडी आणि बंडखोर कलाटे यांनी सहानुभूतीची लाट नसल्यानं भाजपचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणू अन आमची विकासाची दिशा जनतेला पटवून देऊ अन विजय मिळवू. असा विश्वास व्यक्त केला आहे.