पुणे/बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराला सहा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रित प्रचार करणार आहेत.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, की महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराची मोहीम ६ नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार असून, तीनही पक्षांंचे नेते प्रचाराला एकत्रित सुरुवात करणार आहेत. ज्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षाच्या एकापेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केेले आहेत. त्यावर सर्व पक्षांचे नेते एकत्रित बसून चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील.

Shiv Sainiks held a meeting and decided not to work as a candidate of Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच काम करणार नाहीत, शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचा डाव….;शिवसैनिक आक्रमक
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Zeeshan Siddique joins Ajit Pawar group contest from bandra east
Zeeshan Siddique: मविआनं तिकीट नाकारलं, झिशान सिद्दिकी आता अजित पवार गटातून आदित्य ठाकरेंच्या भावाला टक्कर देणार
peace on border our priority pm modi tells xi jinping
सीमेवरील शांततेला प्राधान्य असावे’; जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
ravikant tupkar s krantikari shetkari sanghatana
रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास अनुकूल
bjp leader dilip bhoir
अलिबागमधून भाजपचे दिलीप भोईर बंडखोरीच्या तयारीत
adv Wamanrao Chatap
शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वामनराव चटप आठव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात
loksatta readers feedback
लोकमानस: निवडणुकांपलीकडच्या लोकशाहीचा विचार महत्त्वाचा!

हेही वाचा – ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात लागले फ्लेक्स

विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल द्यावा, यासाठी महाविकास आघाडीत सहभागी असलेले सर्व पक्ष एकत्रित प्रचार मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून लोकांनी पाठिंंबा द्यावा, अशी परिस्थिती निर्माण केली जाणार आहे. आमची भूमिका पाहून राज्यातील जनतादेखील आम्हाला साथ देईल, असे पवार म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत ताकत दाखविण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन पवार यांनी केले. दरम्यान, सिंचन घोटाळा प्रकरणावरून सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाबाबत पवार यांना विचारण्यात आले असता, ‘आज चांगला दिवस आहे,’ असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

हेही वाचा – पिंपरी : अडीच लाख मालमत्ता कर कक्षेत, ३०० कोटींचा महसूल वाढणार

दिलीप वळसे पाटील यांंच्यावर टीका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या त्रासाची माहिती देण्यासाठी विविध मतदारसंघांंतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यावर पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांंचा नामोल्लेख न करता टीका केली. ते म्हणाले, की यापूर्वी अनेकदा आपण सत्तेत होतो. त्या वेळी आंबेगावच्या सहकाऱ्याला सातत्याने संधी दिली. जनता दुसऱ्या पक्षात सामील झाली नाही; पण आपला प्रतिनिधी सहभागी झाला.