लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविण्यात येणार असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे महाविकास आघाडीला सक्षम उमेदवार मिळणार का, हा प्रश्न उभा राहिला आहे. शहरातील बहुतांश आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाला पाठिंबा दर्शविला आहे. फुटीनंतर शिवसेनेकडे कट्टर शिवसैनिक असले तरी निवडून येणाची क्षमता असलेल्या उमेदवारांसाठी शोधाशोध करावी लागणार आहे. काँग्रेसचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांत जागा वाटपाबाबत एकमत झाले तरी सक्षम उमेदवारांची वानवा जाणवण्याची शक्यता आहे.

dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांची मिळून महाविकास आघाडी झाली. आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी कायम ठेवून लढविण्याचेही महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या तिन्ही जागा वाटपासंदर्भात नव्याने चर्चा होणार आहे. मात्र, जागा वाटपाबाबत एकमत झाले तरी, या तिन्ही पक्षांना उमेदवारांसाठी शोधाशोध करावी लागण्याची शक्यता आहे. त्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-जेजुरीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबूब पानसरे खून प्रकरणात आणखी एक जण अटकेत

महापालिकेच्या सभागृहात गेल्या निवडणुकीवेळी १६४ नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये ९९ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे, ४३ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे, नऊ नगरसेवक शिवसेनेचे आणि १० नगरसेवक काँग्रेसचे होते. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन आणि एमआयएमचा एक नगरसेवक होता. राज्यातील सत्ता समीकरणे गेल्या वर्षभरात बदलली आहेत. शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना संघटना म्हणून फारशी फुटली नाही. मोजके नगरसेवकच शिंदे गटात सहभागी झाले असले तरी गेल्या निवडणुकीतही शिवसेनेला सक्षम उमेदवारांची कमतरता जाणवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट बाहेर पडला आहे. त्यांना शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

आणखी वाचा-लोकमान्य टिळक पुरस्कारावरून वादंग,मोदी यांचा गौरव करण्यास काँग्रेससह आप, युक्रांदचा विरोध

शिंदे-फडणवीस-अजित पवार गट आगामी निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडे उमेदवार कोण असणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. शिंदे-फडणवीस-अजित पवार गटाकडून निवडणुकीसाठी तिकीट न मिळालेल्या नाराज उमेदवारांवर महाविकास आघाडीला भिस्त ठेवावी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडेही उमेदवार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, शिवसेनेतील काही माजी नगरसेवकांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही सर्व परिस्थिती पहाता महाविकास आघाडीला सक्षम उमेदवारांची वानवा जाणवेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.