पुणे : महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वी सभा ठरली आहे. तेथील पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आटोक्यात आणून परिस्थिती पूर्ववत करावी. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सभा होणारच, अशी स्पष्टोक्ती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना मदत बंद; मविआची आणखी एक योजना बासनात

हेही वाचा – “आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार”, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावलं; म्हणाले, “काही माणुसकी…”

पुणे दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी सभेची तयारी केली आहे. सभा रद्द केल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये खूपच गंभीर परिस्थिती असल्याचा संदेश राज्यात जाईल. त्यामुळे ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीची सभा होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi meeting will be held in chhatrapati sambhajinagar says opposition leader ajit pawar pune print news psg 17 ssb