पुणे : अनैतिक संबंधास विरोध केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यावर चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी एकास गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. सिद्धांत दिलीप मांडवकर (वय १९, रा. धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गोपाळ कैलास मंडवे (वय ३२, रा. ओवी आंगण काॅलनी, जाधवनगर, रायकर मळा) असे खून झालेल्याचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंडवे पर्वती उपविभागातील महावितरण केंद्रात वरिष्ठ तंत्रज्ञ होते. मंडवे यांच्या ओळखीतील एका महिलेशी आरोपी मांडवकरचे अनैतिक संबंध होते. मंडवे यांनी त्याला समज दिली होती. सोमवारी (४ सप्टेंबर) मांडवकर आणि मंडवे यांच्यात वाद झाला. त्यावेळी मंडवे यांनी त्याला दुचाकीवरुन धायरीतील रायकर मळा भागात नेले. तेथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. मांडवकरने त्याच्याकडील चाकूने मंडवे याच्यावर वार केले. चाकू 8हल्ल्यात मंडवे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पसार झालेला आरोपी मांडवकर याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता.

हेही वाचा >>> Pune Crime News: महिला पोलीस शिपायाला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; पोलीस शिपायावर गुन्हा

गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी धनंजय ताजणे यांना पसार झालेला मांडवकर कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालय परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मांडवकरला पकडले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, उपनिरीक्षक शाहीद शेख, प्रदीप राठोड, मॅगी जाधव, गणेश ढगे, शविाजी सातपुते, नारायण बनकर आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran employee killed for opposing immoral relationship pune print news rbk 25 ysh