पुणे : विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार ) यांच्या महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. राज्यात महायुतीच्या २८८ पैकी २३५ जागा विजयी झाल्या आहेत. तर पुणे शहर आणि जिल्ह्याचा विचार करता महायुतीला २१ पैकी १८ जागा जिंकता आल्या आहेत. जनतेने महायुतीला कौल दिल्याने गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील सहा महिन्यांच्या आत होण्याची शक्यता आहे.

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत. काही निवडणुका या तीन वर्षांपासून तर काही निवडणुका दोन ते अडीच वर्षांपासून रखडलेल्या आहेत. इतर मागासवर्ग समाजाचे (ओबीसी) आरक्षण आणि प्रभागरचना याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळालेली आहे. त्यातच गेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्यात ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले, ते पाहता या निवडणुका यापूर्वी घेण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याचा मोठा फटका राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीला बसला असता, अशी भीती राज्यकर्त्यांच्या मनात असल्याने या निवडणुका लांबत गेल्या आहेत.

Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
One Nation One Election , Constitution , Federalism,
संविधान पायदळी तुडवून निवडणुकीचा खर्च आणि वेळ वाचवायचा आहे?
One Nation One Election Joint Parliamentary Committee
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना; प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह ३१ सदस्यांचा समितीत सहभाग
आम आदमी पक्षाने 'त्या' १३ उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात का उतरवलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : आम आदमी पार्टीने ‘त्या’ १३ उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात का उतरवलं?
Image of Lok Sabha Modi government.
One Nation One Election : मोदी सरकारची परीक्षा! लोकसभेत सादर होणार ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक; सर्व पक्षांकडून खासदारांना व्हीप
Arvind Kejriwal to contest from New Delhi AAP announces final list of 38 candidates
केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढविणार; आपच्या ३८ उमेदवारांची अंतिम यादी जाहीर
Ravindra Chavan supporters are upset because they did not get the ministerial post print poltics news
रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजी

हेही वाचा…आघाडीच्या पराभवात बंडखोर, वंचित, मनसेचा हातभार, कुठे घडला प्रकार ? महायुतीच्या उमेदवारांना दोन मतदार संघात तारले.

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने जो विश्वास महायुतीवर दाखवून त्यांना विजयी केले आहे. हे पाहता सध्याचे वातावरण महायुतीसाठी पोषक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा फायदा घेत रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा असणार आहे. या माहितीला महायुतीमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. पुढील सहा महिन्यांत या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरणार होते. निवडणुकीत महायुती अथवा महाविकास आघाडीला कसे यश मिळते, यावर या निवडणुका पुढील वर्षात होणार का? हे देखील ठरणार होते. या निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश पाहता गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका तातडीने घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार आहे.

हेही वाचा…‘औषधनिर्माणशास्त्र’ची रखडलेली प्रवेश प्रक्रिया सत्तास्थापनेनंतरच… काय आहे कारण?

राज्यातील अनेक महापालिकांच्या प्रभागरचना तसेच जिल्हा परिषद, पंचायती समिती यांच्या गट आणि गणरचना निश्चित झालेल्या आहेत. त्यामुळे आता त्यावर पुढची निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. यासाठी न्यायालयात आवश्यक ती भूमिका मांडून या निवडणुकांवरील स्थगिती उठवावी लागणार आहे. राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असल्याने ही स्थगितीदेखील आता लवकरच उठविली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुण्यात होणार नव्याने प्रभाग रचना

पुणे महापालिकेत प्रभागरचना यापूर्वी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेला पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

हेही वाचा…मराठी चित्रपटांना दिशा देणारा अनोखा प्रयोग… पुण्यात प्रायोगिक नाट्यगृहात चित्रपटाचे खेळ…

महायुतीत निवडणूक होणार, की स्वतंत्र लढणार?

महायुतीच्या सरकारला विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत या तीनही पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या असणार आहे. महायुतीमध्ये निवडणूक लढवायची झाल्यास अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीला तोंड द्यावे लागणार आहे. या निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधिक्य आणि विजयी उमेदवारांची संख्या लक्षात घेता महापालिकेच्या निवडणुकीत महायुती नक्की टिकणार का? महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

Story img Loader