लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : या निवडणुकीत महायुतीला पश्चिम महाराष्ट्राने जेमतेम काठावर ठेवले आहे. गेल्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी ९, तर नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ जिंकणाऱ्या महायुतीच्या पदरी यंदा एकूण १२ पैकी फक्त ४ मतदारसंघ आले आहेत.

Amit Shah Nagpur, Nitin Gadkari in Kashmir,
अमित शहा नागपुरात, गडकरी काश्मिरमध्ये, तर्कवितर्कांना ऊत
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Pimpri-Chinchwad, Mahayuti, NCP Ajit Pawar group,
पिंपरी- चिंचवडमध्ये महायुतीत धुसफूस; राष्ट्रवादीचा सर्व मतदारसंघांवर दावा
NCP Ajit Pawar group, Chinchwad, Bhosari,
राष्ट्रवादीचा पिंपरीसह चिंचवड, भोसरीवर दावा; थेट…
nagpur south west constituency
नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपाच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीसांना कुणाशी द्यावी लागेल लढत?
Malegaon Central Constancy
Malegaon Central : मुस्लीम समाजाचं वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघाची पार्श्वभूमी काय आहे?
Solapur District Assembly Elections Shiv Sena Thackeray Group Constituency Candidates
सोलापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची कोंडी; जागा वाटपात मतदारसंघ, उमेदवारांचीही वाणवा
pakistan security 1
नंदनवनातील निवडणूक: पाकिस्तानप्रेमी ‘जमात’ आता निवडणुकीच्या रिंगणात

पुणे जिल्ह्यात ‘जैसे थे’

पुणे जिल्ह्याचा विचार करता, महायुती आणि महाविकास आघाडीला जिल्ह्यातील त्यांचे बालेकिल्ले राखण्यात यश आले. पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे, तर बारामती आणि शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनुक्रमे सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले.

पुणे मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर मुरलीधर मोहोळ यांना कडवी लढत देतील, अशी शक्यता होती. मात्र, मोहोळ यांनी एक लाखापेक्षा जास्त मते घेऊन धंगेकर यांना चीतपट केले. बारामती लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी पराभव केला.

हेही वाचा >>>Baramati Election Results : ‘एक्स’वर अजित पवारांचा ‘ट्रेंड’ ; बारामतीमधील पराभवानंतर समाज माध्यमावर जोरदार टीका

सुजय विखे पराभूत

नगरमध्ये महायुती सपशेल आपटली यापूर्वी महायुतीकडे असलेल्या नगर आणि शिर्डी या दोन्ही जागा यंदा आघाडीने खेचून आणल्या. आघाडीतर्फे अनुक्रमे नीलेश लंके आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी खासदार डॉ. सुजय विखे आणि शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. हे दोन्ही निकाल पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकारणाला धक्का देणारे आहेत.

सांगलीत अपक्ष पाटील यांची सरशी

● साखरपट्ट्यात आघाडीची घोडदौड राजकीयदृष्ट्या चर्चेतील पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह नगरमध्ये महाविकास आघाडीचीच घोडदौड पाहण्यास मिळाली.

●या पाच जिल्ह्यांतील एकूण ८ मतदारसंघांपैकी सातारा आणि हातकणंगले हे दोन मतदारसंघ वगळता अन्य सर्व जागांवर महायुतीला पराभव पत्करावा लागला.

●उर्वरित सहापैकी कोल्हापूर, माढा आणि सोलापूर, नगर आणि शिर्डी मतदारसंघांत आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. सांगलीत बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी यश मिळवले आहे.

●गेल्या निवडणुकीवेळी या ८ पैकी तब्बल ७ मतदारसंघांवर महायुतीने विजय मिळवलेला होता. २०१९ मध्ये विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेला एकमेव सातारा मतदारसंघ खेचून घेण्यात मात्र महायुतीला यश आले आहे.