चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात निकाल लागण्याआधीच महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयाचे फलक झळकले आहेत. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे मात्र निकाल लागण्याआधीच विजयाचे फलक लागल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे असा सामना झाला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप विरुद्ध महाविकास राहुल कलाटे असा सामना रंगला आहे. महायुतीकडून शंकर जगताप यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर त्यांनी विरोधकांची मोठ बांधून निवडणूकाला सामोरे गेले. दुसरीकडे ऐनवेळी शरद पवार गटात आलेले राहुल कलाटे यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी मोठी ताकद लावली. दोन्ही उमेदवारांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघ प्रचार करत असताना पिंजून काढला.
आणखी वाचा-पिंपरी: विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार आमदार अण्णा बनसोडे यांचा दावा
राहुल कलाटे यांच्यासाठी खासदार अमोल कोल्हे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघासह भोसरी विधानसभा मतदारसंघात शड्डू ठोकून होते. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी सभा घेतल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी शरद पवार यांनी रोड शो घेत जाहीर सभा देखील घेतली होती. दोन्ही उमेदवारांनी मोठी ताकद लावली आहे. परंतु, निकालाआधीच अतिउत्साही कार्यकर्त्यांनी शंकर जगताप यांचे आमदार म्हणून फ्लेक्स लावल्याने चर्चा सुरू झाली आहे.