लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील २५ लाख मतदार माझे नातेवाईक आहेत. ही देशाची निवडणूक असून नात्यागोत्यावर, भावनिक मुद्यावर होणार नसल्याचे सांगतानाच समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल यावर बोलताना समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही, असे म्हणत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांचे कोणतेही आव्हान नसल्याचे सांगितले. त्यानंतर माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समोर कोण उमेदवार आहे, हे स्पष्ट होईल असे तत्काळ स्पष्टीकरण बारणे यांनी दिले.

प्रचाराची माहिती देण्यासाठी महायुतीची कासारवाडीत सोमवारी (१५ एप्रिल) पत्रकार परिषद झाली. यावेळी खासदार बारणे बोलत होते. आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा- शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान

पनवेल, उरणला महायुतीचा मेळावा झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही मेळावा झाला. सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेत. सर्व नाराजी दूर झाली आहे. महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत खासदार बारणे म्हणाले, की २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्यासाठी येणार आहेत. प्रचारासाठी राज्यातील, केंद्रातील नेते येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपरी-चिंचवड शहरात सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पनवेलला सभा होईल. तर, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मावळमध्ये सभा होणार आहे. मागीलवेळी साडेसात लाख मते पडली होती. मागच्यावेळीपेक्षा जास्त मताधिक्य असेल याची खात्री आहे.

अजित गव्हाणे म्हणाले की, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करतील. भाजपचे अमर साबळे म्हणाले, की मागील दोन निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य खासदार बारणे यांना मिळेल.