पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सोमवारी (२२ एप्रिल) रणशिंग फुंकण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. २५ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता आकुर्डीतून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अर्ज भरण्यासाठी येणार आहेत. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा; राज्याच्या अन्य भागांत पावसाची शक्यता

मावळ मतदारसंघातील प्रचारात अद्याप रंगत आली नाही. दोन्ही उमेदवारांचा गाठीभेटींवरच भर दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येईल. सभांचा धडाका सुरू होईल.

हेही वाचा – उन्हाच्या झळांचा केळीला फटका; जळगाव, सोलापुरात १५ हजार हेक्टरवर बागा सुकल्या

वाघेरे उद्या अर्ज भरणार

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे उद्या (२३ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वाघेरे यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti demonstration of strength today in maval lok sabha pune print news ggy 03 ssb
Show comments