पुणे : महायुतीच्या जागावाटपात शहरातील एकही जागा न मिळालेल्या शिवसेनेकडे (शिंदे) महायुतीच्या नेत्यांनी विशेष जबाबदारी सोपविली आहे. शहरातील ‘धोक्या’तील जागांसाठी शिवसेनेची कुमक देण्यात आली असून, शिवाजीनगर, वडगावशेरीसह अन्य काही मतदारसंघांत लक्ष घालण्याची सूचना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्याचा दैनंदिन आढावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जात आहे.

महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे दोन पक्ष शहरातील आठ मतदारसंघांत लढत आहेत. तेथे शिवसेना (शिंदे) पक्षाचा एकही उमेदवार नाही. या आठ मतदारसंघांपैकी कसबा, पर्वती, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट अशा सहा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार असून, वडगावशेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत.

NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपला काही जागांवर निसटता विजय मिळाला होता. त्यामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, खडकवासला या मतदारसंघांचा समावेश होता. शिवाय, कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असूनही पोटनिवडणुकीत तेथे भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे या जागांकडे महायुतीने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघांत महायुतीची एकत्रित यंत्रणा आहे. मात्र, त्यानंतरही शिवसेनेकडे विशेष जबाबदारी देण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. शिवाजीनगरमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोखलेनगर येथील सभा हा त्याचाच एक भाग होता. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या नियोजनामुळेच या सभेचे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा >>> मतदान दिनाच्या गमतीजमती!

शिवाजीनगर मतदारसंघात एके काळी शिवसेनेचा आमदार होता. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. ही बाब विचारात घेऊन शिवसेनेकडे नियोजन देण्यात आले आहे. खडकवासला, वडगावशेरी मतदारसंघांतही तशीच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महायुतीच्या यंत्रणेबरोबरच शिवसेनेची स्वतंत्र यंत्रणाही येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> आचारसंहिता भंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल; सिंहगड रस्ता पोलिसांकडून कारवाई

कशी पुरविणार रसद?

मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांच्या प्रचार सभांचे आयोजन करणे, शिवसैनिकांच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणे, प्रचाराच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर बैठका घेणे, अशी कामे शिवसेनेकडून केली जाणार आहेत. त्याचा दैनंदिन आढावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जात असून, काही सूचनाही केल्या जात आहेत. यापुढील टप्प्यात शिवसेनेकडून मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करण्यासंदर्भातील नियोजन सुरू आहे. महायुतीची समन्वय यंत्रणा कार्यान्वित असून, त्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.

नाराजीचा परिणाम होणार का?

महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला शहरातील एकही जागा मिळालेली नाही. हडपसर विधानसभा मतदारसंघ मिळावा, अशी शिवसेनेची आग्रही मागणी होती. हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला या तीन जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून जागावाटपापूर्वी पाठविण्यात आला होता. मात्र, तरीही शहरातील एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेची यंत्रणा किती कार्यरत राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader