लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: देशातील शेतकरी, बळीराजाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींवरील बंदी पूर्णत: उठवण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. हा निकाल शेतकरी, भूमिपूत्र आणि गाडामालकांसह बळीराजाला समर्पित आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. वर्षभरापूर्वी न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली होती. मात्र, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर अंमित सुनावणी सुरू होती. काहीअंशी जिंकलेला हा न्यायालयीन लढा पूर्णत: जिंकण्यासाठी देशभरातील शेतकरी, बैलगाडा मालकांच्या नजरा या निकालाकडे लागल्या होत्या.

आणखी वाचा-Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीला परवानगी कशी मिळाली? वैज्ञानिक अहवालाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बैल धावणारा प्राणी…”

दरम्यान, महाराष्ट्रातून बैलगाडा शर्यतीसाठी जनआंदोलन उभारण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्य सरकारने बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत विधिमंडळात कायदा तयार केला होता. तसेच, बैलांच्या पळण्याच्या क्षेमतेबाबत ‘रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल्स’ हा अहवाल तयार करण्यासाठी समितीची नेमणूक केली होती. तो अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. राज्य सरकारच्या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या ११ वर्षांच्या लढ्यानंतर अखेर सर्वोच्च न्यालयात बैलगाडा शर्यतीवरील बंदी पूर्णत: काढण्यात आली असून, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ कायमस्वरुपी सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे बैलगाडा संघटनेचे संदीप बोदगे यांनी म्हणाले.

आणखी वाचा-भाजपच्या राज्य बैठकीमुळे पुणेकर वाहतूक कोंडीत

सर्वोच्च न्यायालयात हा लढा सुरू असताना अनेक लोकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान आणि सहकार्य केले आहे. राज्यातील बळीराजा आज खऱ्या अर्थाने आनंदोत्सव साजरा करणार आहे. बैलगाडा शर्यत हा केवळ खेळ नाही, तर आपली महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या लढ्यात सर्वाधिक योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्व पदाधिकारी, बैलगाडा शौकीन आणि गाडाप्रेमींचे मी अभिनंदन करतो. या पुढील काळात हा महाराष्ट्राचा उत्सव अत्यंत दिमाखात साजरा करुया आणि शेती-माती- संस्कृतीसाठी कटिबद्ध राहुयात. -महेश लांडगे, आमदार

Story img Loader