भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकलेले मात्र नाटय़मय घडामोडीनंतर माघार घ्यावी लागलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश लांडगे पुन्हा आपले राजकीय भवितव्य आजमावून पाहात आहेत. भोसरीत कबड्डी व कुस्ती स्पर्धाचे आयोजन करून लांडगे यांनी ‘लक्ष्य २०१४’ ची मोर्चेबांधणी केली आहे. आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महापौर मोहिनी लांडे हे राष्ट्रवादी नेते स्पर्धापासून बाजूला असताना पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र आवर्जून हजेरी लावणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
विलास लांडे व महेश लांडगे यांच्यात जवळचे नाते आहे. समज-गैरसमज व राजकीय डावपेचातून लांडे यांच्याकडून महेश लांडगे दुखावले आहेत. दोन वेळा नगरसेवक झाल्यानंतर व स्थायी समिती अध्यक्षपद तसेच महापौरपदाने हुलकावणी दिल्यानंतर लांडगे यांना आता आमदार व्हायचे आहे. लांडे यांच्या विरोधी गटाची छुपी ताकद महेश लांडगे यांच्या पाठिशी असून या स्पर्धाच्या निमित्ताने ते पुन्हा अधोरेखित झाले आहे. यापूर्वी चिखलीतील कबड्डी स्पर्धेत नको त्या गोष्टी करून स्पर्धा उधळून लावण्याचे प्रयत्न झाले, त्यामागे लांडे यांचे राजकारण असल्याची शंका व्यक्त झाली होती. तथापि, लांडे यांनी ते आरोप फेटाळले होते. त्या घटनेचे पडसाद अद्याप उमटत आहेत. आता खुद्द भोसरीत स्पर्धा असूनही विलास लांडे यांचा कोणताही सहभाग नाही. त्यामुळे लक्ष्मण जगताप व अण्णा बनसोडे देखील चार हात लांब आहेत. लांडे की लांडगे यांच्याविषयी आझम पानसरे यांची द्विधा मनस्थिती दिसते. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी महापौर नानासाहेब शितोळे, ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत गावडे आदींची हजेरी होती. मात्र, ती स्पर्धात्मक पातळीवर होती, असे सांगण्यात आले.
शरद पवार, अजित पवार यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील स्पर्धेसाठी येणार आहेत. नेत्यांसमोर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी लांडगे समर्थकांनी सुरू केली आहे. भोसरी मतदारसंघात स्पर्धाचे स्वागतफलक जागोजागी झळकत असून त्यात ‘लक्ष्य २०१४’ चा सूचक उल्लेख आहे. लांडगे यांच्या पोस्टरबाजीमुळे व एकूणच त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या आव्हानामुळे विलास लांडे यांची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र, पवार काका-पुतणे या सर्व घडामोडींकडे कशाप्रकारे पाहतात, त्यावरच विलास लांडे आणि महेश लांडगे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
साहेब, दादांची हजेरी अन् महेश लांडगे यांचे शक्तिप्रदर्शन
भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकलेले मात्र नाटय़मय घडामोडीनंतर माघार घ्यावी लागलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश लांडगे पुन्हा आपले राजकीय भवितव्य आजमावून पाहात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-11-2013 at 02:37 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh landge willing candidate for bhosari legislative assembly