शालेय शिक्षण विभागाच्या योजना शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. गेले काही महिने शरद गोसावी यांच्याकडे परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
हेही वाचा >>>पुणे: ‘पीएमपी’चे ग्रामीण भागातील अकरा मार्ग बंद; उद्यापासून अंमलबजावणी
शिक्षण विभागातील महत्त्वाची पदे गेल्या काही महिन्यांपासून अतिरिक्त कार्यभाराने चालवण्याची वेळ आली आहे. त्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याकडे योजना संचालनालय, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार असतानाही प्राथमिक शिक्षण संचालकपदाचीही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्याकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. गोसावी यांच्याकडे असलेल्या तीन कार्यालयांपैकी परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी आता पालकर यांच्याकडे देण्यात आल्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव टि. वा. करपते यांनी परिपत्रकाद्वारे दिले.