शिरुर नगरपरिषद कडून  कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने केले जात नसून या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा  वतीने पालिकेस नोटीस बजाविण्यात आली असल्याचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .पत्रकार परिषदेला शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप , मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे ,शहराध्यक्ष आदित्य मैड आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सय्यद म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने शिरुर नगरपरिषदेच्या घन कचरा संकलन केंद्रावर शास्त्रशुध्द पध्द्तीने कचरा विल्हेवाट न लावता कचरा जाळल्याने परिसरात वायू प्रदूषन होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडे करण्यात आली  होती . या तक्रारीची दखल घेत प्रदूषण मंडळाच्या आधिकारी सुषमा कुंभार यांनी कचरा संकलन केंद्रास भेट  देवून तक्रारीची शहानिशा केली होती व स्थानिक नागरिकांशी चर्चा केली   .त्यानंतर या बाबतचा  कायदेशीर कार्यवाहीचा अहवाल उपप्रादेशिक संचालक महाराष्ट्र प्रदूषण मंडळ पुणे यांना  जानेवारी  २०२५ दिला होता . त्या अनुषंगाने जे. एस. साळुंखे प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांनी शिरूर नगरपालिकेस नोटीस बजावली आहे.

या संदर्भात सन -१९७४ च्या कलमानुसार पाणी व वायू प्रदूषण नियंत्रण नियमावली व सन -१९८१ च्या कायदानुसार पालिकेस नोटीस बजाविण्यात आली आहे . घन कचराचे व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा त्यांनी नेमून दिलेल्या एजन्सीची आहे .सय्यद म्हणाले प्रादेशिक संचालकांनी दिलेल्या नोटीसीत पालिकेस आपणा विरोधात कारवाई का करु नये असे म्हटले असून भविष्यातील घनकचरा प्रक्रियेवरील आढावा सादर करुन त्यावरील उपाययोजना संदर्भातील अहवाल १५ दिवसात सादर करावा अथवा कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे .आम्ही याबाबत सन २००७ पासून पालिकेकडे तक्रार करुन ही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून शासनाचा निधीचा दुरुपयोग पालिका करीत आहे .अनिल बांडे म्हणाले की यासंदर्भात महाराष्ट्र हरित लवाद कडे दाद मागण्यात येणार आहे.

दरम्यान या संदर्भात मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की संकलित होणा-या घनकचरात बॅटरीसह अन्य घटकांचा समावेश होतो .कचराचे ढिगावर ढिग साचून मिथेन गॅस तयार होतो उन्हा मुळे बॅटराच्या स्फोट होतो व कचरा पेट घेतो . पालिका घनकचरा दालमिया सिमेंट कंपनीला पाठवते व कंपनी त्यावर प्रक्रिया करते . कचरावर प्रक्रिया करण्यासाठीची मशिनरी खरेदी करण्याचा प्रस्ताव ६ महिन्यापूर्वी करण्यात आला असून त्यास तांत्रिक मान्यता मिळून निधी मंजूर झाला आहे. शासनाची मान्यता मिळाल्यावर ही मशिनरी खरेदी करण्यात येणार आहे .१५ दिवसात कचरांचे ढीग कमी होतील याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे .  लुक्रो प्लॅस्टिक सायकल प्रा . लि .ही  एनजीओ संस्था कचरा निर्मुलनाकरीता स्वंत : मनुष्यबळ व मशिनरी पुरवून कचरावर प्रक्रिया करते. या एजन्सी सोबत ही पालिका करार करणार आहे .पालिका कचरावर प्रक्रिया करण्यास  कटिबध्द असून येत्या काही दिवसात कचरा डेपोचे चित्र बदलले दिसेल असे ही पाटील म्हणाले .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahibub syed statement regarding maharashtra pollution control board notice to shirur municipal council pune print news amy