केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार बँक ऑफ महाराष्ट्र लवकरच महिलांसाठी स्वतंत्र बँक स्थापन करणार आहे, अशी माहिती बॅंकेचे नवनियुक्त संचालक सायडीवाल यांनी दिली.
महाराष्ट्र बॅंकेच्या अधिकाऱ्यांतर्फे घेतलेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. बॅंकेचे सहायक सरव्यवस्थापक गिरीश वझे यांच्या हस्ते सायडीवाल यांचा सत्कार करण्यात आला. बँकेत विसरलेले दीड कोटी किमतीचे हिऱ्यांचे दागिने, सोन्याचे दागिने ग्राहकाला परत देणारे कर्मचारी गिरीश दंडे, कैलास बाराते, तसेच उल्लेखनीय ग्राहक सेवा देणारे प्रभाकर वडवेकर यांचा कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सायडीवाल म्हणाले, ‘‘ कर्मचारी संघटनेतील सहभागामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची मला योग्य जाणीव आहे. प्रभावी ग्राहकसेवेसाठी कर्मचाऱ्यांवर अधिक जबाबदारी टाकणार आहे.’’ सूत्रसंचालन बांगड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजेंद्र कोकाटे, मनीषा घाटे, वझे, पत्की, इ. सहभाग नोंदविला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा