पुणे : घरकाम करणाऱ्या महिलेने तीन लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली. या प्रकरणी घरकाम काम करणाऱ्या महिलेच्या विरोधात मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सुरेखा चव्हाण (वय ४०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> पुणे : सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडून तीन लाखांचा ऐवज लांबविला

ज्येष्ठ महिला मार्केट यार्ड भागातील गगन विहार सोसायटीत राहायला आहे. चव्हाण गेल्या वर्षभरापासून ज्येष्ठ महिलेच्या घरात काम करते. ज्येष्ठ महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून तिने कपाटातील तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ महिलेने चव्हाण हिने दागिने लांबविल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

Story img Loader