पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलारसह साथीदार रामदास मारणे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. शेलार आणि रामदास मारणेच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. फरार असलेला दुसरा मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घ्यायचा आहे. गणेश मारणेने न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेलार आणि गणेश मारणे मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली होती. गणेश मारणे सापडल्यानंतर अनेक बाबी समोर येतील. तपासासाठी शेलार आणि रामदास मारणे यांना चार दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी केली.

आरोपींच्या वतीने ॲड. डी. एस. भोईटे आणि लोक अभिरक्षक कार्यालयाच्या ॲड. रोहिणी लांघे यांनी बाजू मांडली. पोलिसांच्या तपासात नवीन काहीच मुद्दे नाहीत. मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मागितली जाते. तपासात प्रगती झालेली दिसत नाही, असा युक्तिवाद ॲड. भोईटे यांनी केला. सरकारी वकील ॲड. नीलिमा इथापे-यादव यांनी युक्तिवाद केला.

हेही वाचा : गुंड गजानन मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

तपास प्रगतिपथावर आहे. आरोपींनी मोहोळचा खून करण्यापूर्वी गोळीबाराचा सराव कोठे केला, ही जागा शोधली आहे. पोलिसांनी वाहने जप्त केली आहेत, असे ॲड. इथापे-यादव यांनी युक्तिवादात सांगितले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने शेलार आणि रामदास मारणे यांना एक फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Main accused in gangster sharad mohol murder case applied for anticipatory bail pune print news rbk 25 pbs