मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले आहेत. द्रुतगती मार्गावरील पळस्पा हद्दीतील पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात घडला. यामध्ये दिपक दत्तात्रय बोराटे (४५) व मंदाकिनी दिपक बोराटे (५०) या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. तर, राहुल बोराटे, गंगुताई चिरमे व प्रगती चिरमे हे तिघेजण जखमी झाले आहेत. या सगळ्यांवर सध्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण पुण्यातील गोखले नगर येथील रहिवासी आहेत.
आणखी वाचा