पुणे: मुंबई द्रुतगती मार्गावर मोठा अनर्थ टळला आहे. ब्रेक फेल झालेला भरधाव ट्रक अमृतांजन पुलाच्या खाली असलेल्या वळणावर जाऊन धडकला. सुदैवाने यात जीविहितहानी झालेली नाही. ट्रक चालकाने देखील वेळीच उडी घेतल्याने तो बचावला आहे. ही घटना आज सायंकाळी सव्वा पाच सुमारास घडली आहे.
व्हिडिओ :
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक हा पुण्याहून मुंबई च्या दिशेने सिमेंट च्या गोनी घेऊन जात होता. अमृतांजन पुला आधी सुसाट असलेल्या ट्रक चा अचानक ब्रेक फेल झाले आणि चालकाचा ताबा सुटला. भरधाव ट्रक ने एका बस ला ठोकर दिली. यामुळं घाबरलेल्या चालकाने स्वतः चा जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून उडी घेतली. ट्रक अमृतांजन पुलाच्या खाली वळणाच्या दिशेने भरधाव गेला. अमृतांजन पुला खालून पुढे गेल्यानंतर वळणावरील डिव्हाडर ला जाऊन धडकला. हा घटनेचा व्हिडिओ समोर आला असून मोठा अनर्थ टळल्याच स्पष्ट होत आहे. ट्रक लेन तोडून गेला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. अनेक वाहनांना धडक दिली असती. असच या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.