पुणे: भीमा-कोरेगाव येथे एक जानेवारी २०२४ रोजी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी (३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक बदल करण्यात येणार आहे. वाहतूक बदलाबाबतचे माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार असून, वाहनचालकांनी सहकार्य करावे , असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक एक जानेवारी २०२४ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे. पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरुन वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरुन विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड,मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे नगरकडे जावे.

Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special local trains on New Year Local trains will run at night on Central and Western Railways
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
police Pune, police at night, Pune, police news,
पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा

हेही वाचा… आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याला पुणेकरांची पसंती! जाणून घ्या नेमके कारण…

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरुकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरुन केवळ अनुनायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जडवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम वाहने लावण्याची ‌ठिकाणे

जयस्थंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुनायांसाठी प्रशासनाने वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहेत. वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे- लोणीकंद येथील आपले घर, बौद्ध वस्ती, मोनिका हाॅटेलशेजारी, ओमसाई हाॅटेलच्या पाठीमागे, तुळापूर फाटा स्टफ कंपनीशेजारी, राजेशाही मिसळ हाॅटेलच्या मागे, तुळापूर रस्ता वाय पाॅईंट, हाॅटेल शेतकरी मिसळजवळ, तुळापूर फाटा हाॅटेल राॅयल शेजारी, फुलगाव सैनिकी शाळा मैदान, सोमवंशी ॲकडमी, थेऊर रस्ता, खंडोबाचा माळ, पेरणे फाटा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा

Story img Loader