बारामती :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांचे अध्यक्षतेखाली काल रविवारी( ता. २ मार्च ) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बैठक झाली.
या वेळी तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी माळेगांव सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला व माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या धर्तीवर कार्यक्षेत्रातील सर्व गावे व वाड्या वस्त्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्याचे आणि कारखाना सभासद यांची गाठ भेट घेण्याचे आवाहन कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांनी केले, त्या नुसार लगेच या बाबत सोमवारी ( ता. ३ मार्च रोजी) गट नंबर एक माळेगाव खुर्द, येळे वस्ती, पाहुणेवाडी, ढाकाळे, मंगळवार (ता. चार मार्च) गट नंबर दोन,पणदरे, मानाजी वस्ती, पवईमाळ, सोनकसवाडी, कुरणेवाडी, धुमाळवाडी,खामगलवाडी, म्हसोबानगर, गट नंबर तीन बुधवार ( ता. पाच मार्च )रोजी सांगवी, कांबळेश्वर, शिरष्ण,पांढरेवाडी, पिपंळेवस्ती, गट नंबर चार गुरुवारी (ता. सहा मार्चला )रोजी खांडज, शिलवली, गट नंबर पाच शुक्रवार ( ता. सात )रोजी निरा वागज, मेखळी, सोनगाव, घाडगेवाडी. आणि गट नंबर सहा (ता. आठ मार्च ) शनिवार रोजी बारामती, मळद मेडद, गुणवडी,डोरलेवाडी, कऱ्हा वागज, बऱ्हाणपूर,नेपत वळण, उंडवडी, सुपे,उंडवडी कडे पठार,जराडवाडी, सोनकसवाडी, सुपे आदी ठिकाणी संपर्क दौरा होणार आहे, अशी महिती राजवर्धन शिंदे आणि जय पाटील यांनी दिली.
या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष धनवान वदक,बारामती तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्षा ज्योतीताई लडकत आदींसह बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विविध संस्थांचे आजी-माजी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाच्या वतीने निवडणूक प्रचार संदर्भात बैठक घेण्यात आली.)