बारामती: विवाह संस्कार हा हिंदु धर्मातील एक प्रमुख संस्कार मानला जातो ,यामध्ये उपजर वधु वरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन परिवारातील कुटुंबाच्या जडणघडणीसाठी सामाजिक स्तरावर कुटुंबाची ओळख होणे फार गरजेचे व हिताचे असून यातूनच माळी समाजाचा वधु वर परिचय मेळावा राजाभाऊ चिंचकर, विजय हिरवे, निलेश टिळेकर व समाजातील सर्व बांधव व भगिनी यांच्या प्रयत्नातून रविवार (दि.२ मार्च )रोजी महात्मा फुले वसतिगृह येथे सकाळी ११.००  ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात साधारणत १७० वधु वरांचा परिचय  करून देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजीमहाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व आद्यज्योती सावित्रीबाई फुले ,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन व दीपप्रज्वलन करून झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश टिळेकर अध्यक्ष,महात्मा फुले ट्रस्ट यांनी केले.

प्रास्ताविकात श्रम व पैसा वाचवण्यासाठी परिचय मेळावे होणे, ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी निलेश टिळेकर यांनी मांडले. सर्व वधु वरांचा   परिचय राजाभाऊ चिंचकर  व विजयराव हिरवे यांनी केले. या कार्यक्रमास कमलताई हिंगणे,मंगल बोरावके, संजीव बोराटे अध्यक्ष अ.भा.ग्रा. पंचायत, बारामती तालुका,ज्ञानेश्वर  कौले, बापु लोखंडे, किशोर हिंगणे,बापु बनकर , नितीन शेंङे, संजय गिरमे , रोहिदास हिरवे ,सोनु लोणकर,अजय बनसोडे, परशुराम गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महात्मा फुले ट्रस्ट,सर्वोदय प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व समाजातील सर्व मान्यवरांनी प्रयत्न केले.आभार प्रदर्शन  संजीव बोराटे  यांनी केले.

(बारामतीत माळी समाजाच्या वतीने वधू – वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.)

Story img Loader