माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच कोटी ५५ लाख रूपये गुरुवारी पुण्याचे जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले. आतापर्यंत माळीण गावातील मृत व्यक्तींच्या वारसांसाठी सात कोटी ५५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये डिंभे धरण पाणलोट क्षेत्रातील माळीण दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले होते. मृत व्यक्तींच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रूपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मानवतावादी दृष्टीकोनातून पुनर्वसनासाठी तातडीचे सहाय्य म्हणून १ ऑगस्ट २०१४ रोजी दोन कोटी रूपये तातडीने उपलब्ध करून देण्यात आले होते. उर्वरित पाच कोटी ५५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. जिल्हाधिकाऱय़ांकडून ही रक्कम संबंधितांना वितरीत केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा