माळीण गावात दरड कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाऱयाखाली गाडली गेल्याचा उलगडा एका एसटी चालकामुळे झाला. या गावाजवळून एसटी नेणाऱया चालकाला बुधवारी गावातील नेहमीची घरे न दिसल्याने त्याने जिल्हा प्रशासनाला त्याबद्दल माहिती दिली आणि मग सगळी चक्रे वेगाने हालली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील डोंगराळ भागातील माळीण गावाचा मोठा भाग मातीच्या ढिगाऱयाखाली गाडला गेला. बुधवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. गावातील अनेक लोक ढिगाऱय़ाखाली गाडले गेल्याने त्याचबरोबर दुर्गम भाग असल्याने मोबाईलची सुविधा उपलब्ध नसल्याने या घटनेचा उलगडा होण्यासाठी एका एसटी चालकाची मदत झाली. रोज गावाजवळून एसटी नेणाऱया काळे नावाच्या चालकाला गावातील नेहमीची घरे न दिसल्याने त्यांना काहीतरी विचित्र घडल्याची कुणकुण लागली. त्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांकडून जिल्हा प्रशासनाला याबद्दल माहिती दिली. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यापर्यंत माहिती पोहचल्यानंतर मदतकार्याची चक्रे वेगाने फिरू लागली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2014 रोजी प्रकाशित
… आणि माळीणमधील दुर्घटनेचा उलगडा झाला!
माळीण गावात दरड कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाऱयाखाली गाडली गेल्याचा उलगडा एका एसटी चालकामुळे झाला.

First published on: 30-07-2014 at 06:03 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malin landslide incident and st driver