माळीण गावात दरड कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाऱयाखाली गाडली गेल्याचा उलगडा एका एसटी चालकामुळे झाला. या गावाजवळून एसटी नेणाऱया चालकाला बुधवारी गावातील नेहमीची घरे न दिसल्याने त्याने जिल्हा प्रशासनाला त्याबद्दल माहिती दिली आणि मग सगळी चक्रे वेगाने हालली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील डोंगराळ भागातील माळीण गावाचा मोठा भाग मातीच्या ढिगाऱयाखाली गाडला गेला. बुधवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. गावातील अनेक लोक ढिगाऱय़ाखाली गाडले गेल्याने त्याचबरोबर दुर्गम भाग असल्याने मोबाईलची सुविधा उपलब्ध नसल्याने या घटनेचा उलगडा होण्यासाठी एका एसटी चालकाची मदत झाली. रोज गावाजवळून एसटी नेणाऱया काळे नावाच्या चालकाला गावातील नेहमीची घरे न दिसल्याने त्यांना काहीतरी विचित्र घडल्याची कुणकुण लागली. त्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांकडून जिल्हा प्रशासनाला याबद्दल माहिती दिली. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यापर्यंत माहिती पोहचल्यानंतर मदतकार्याची चक्रे वेगाने फिरू लागली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा