लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: अल्पवयीन मुलींना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या एका तरुणास विमानतळ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी संदीप चंदू पासी (वय २०) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गावी गेली होती. आरोपी पासी महिलेच्या घरात भाडेकरू म्हणून राहत आहे. आरोपी पासीने महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने त्यांच्यावर अत्याचार केले. आई गावाहून परत आल्यानंतर घाबरलेल्या मुलींनी तिला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पासीला अटक करण्यात आली आहे.