पिंपरी परिसरात घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे करुन पसार झालेल्या चोरटय़ाला पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले असून दागिने, दुचाकी, मोबाईल असा दोन लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
अजय रमेश भालेराव असे अटक करण्यात आलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी भालेराव याने पिंपरीतील अजमेरा कॉलनी परिसरात घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे केले होते. भालेराव हा कल्याण येथे पसार झाला होता. भालेराव हा कल्याणमधील आधारवाडी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा रचून भालेराव याला पकडले.त्याने अजमेरा कॉलनी परिसरात घरफोडी आणि वाहनचोरीचे चार गुन्हे केल्याची क बुली दिली आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल, दुचाकी असा दोन लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक मसाजी काळे, उपनिरीक्षक हरिष माने, सहायक फौजदार अरुण बुधकर, हवालदार राजेंद्र भोसले, प्रभाकर खणसे, नवनाथ लकडे, शिवराज कलाडीकर, महादेव जावळे, संतोष दिघे, दादा धस, लक्ष्मण आढारी, सुनील चौधरी यांनी ही कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा